ॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या  विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी !

ॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी !

नवी दिल्ली – ॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याच्या  विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. एससी/एसटी सुधारणा विधेयक म्हणजेच ॲट्रॉसिटी कायदा कडक करण्याचे विधेयक संसदेत संमत करण्यात आले होते. त्यानंतर या विधेयकाला राष्ट्रपतींनी आज मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा कायदा आणखी कडक करण्यात आला आहे.

दरम्यान विधेयकात १८ अ कलम समाविष्ट करण्यात आले असून या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस अधिक्षकाच्या परवानगीची गरज नाही. तसेच या कलमानुसार ॲट्रॉसिटी तक्रार दाखल झाल्याबरोबर तात्काळ अटक करता येणार असून तक्रारीची खातरजमा करण्याचीही गरज राहणार नाही. त्यामुळे ॲट्रॉसिटीचा कायदा आणखी कडक करण्यात आला आहे.

COMMENTS