राहुल गांधी मंदबुद्धी, हे त्यांचं शिकण्याचं वय नाही – भाजप नेत्या

राहुल गांधी मंदबुद्धी, हे त्यांचं शिकण्याचं वय नाही – भाजप नेत्या

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मंदबुद्धी आहेत. हे त्यांचं शिकण्याचं वय नाही. ते ‘ज्या प्रकारच्या गोष्टी बोलतात त्या आश्चर्यकारक आहेत. ते नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हे त्यांचं शिकण्याचं वय नसल्याची जोरदार टीका भाजपच्या नेत्या सरोज पांडे यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आता नव्या वादाची ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान छत्तीसगडमधील दुर्ग येथील एका कार्यक्रमात सरजो पांडे बोलत होत्या. त्यावेळी बोलत असताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जी व्यक्ती वयाची ४० वर्ष उलटल्यानंतर शिकत असेल त्याला शिकतोय असं म्हणू शकत नाही, अशा व्यक्तीला मंदबुद्धी म्हणतात’ तसेच ते ज्या प्रकारची वक्तव्य करत आहेत. यावरुन ते मंदबुद्धी असल्याचं दिसत आहे. असं सरजो पांडे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS