त्यापेक्षा जमिनीवरील जिवंत माणसे जगवा, राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून ‘वल्लभभाईं’चा सल्ला !

त्यापेक्षा जमिनीवरील जिवंत माणसे जगवा, राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून ‘वल्लभभाईं’चा सल्ला !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्राद्वारे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यावरुन त्यांनी सरकारला फटकारे लगावले आहेत. वल्लभभाईंच्या पुतळ्याचा खर्च 2290 कोटी रुपये एवढा वल्लभाईंना तरी कसा पटेल? अशी खरमरीत टीका राज यांनी व्यंगचित्राद्वारे केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमध्ये नर्मदा नदीत उभा करण्यात आला आहे. यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले असून या व्यंगचित्रात राज यांनी मोदींना वल्लभभाईंच्या पुतळ्याला हार घालताना दाखवले आहे. तर, त्यांच्यापाठीमागे भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांना दाखवण्यात आले आहे.

राज यांनी यातून मोदी स्वार्थी राजकारण करत असल्याचे म्हटले आहे तर तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका खर्च करुन पुतळे उभे करण्यापेक्षा जमिनीवरील जिवंत माणसे जगवा, असा सल्ला वल्लभभाई पटेल देत असल्याचे राज यांनी व्यंगचित्रातून दाखवले आहे.  त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाच राज ठाकरेंच्या या व्यंगचित्राची चर्चा रंगली आहे.

COMMENTS