राजू शेट्टींची भाजप खासदारासोबत गळाभेट, 1 तारखेच्या मोर्चाचंही दिलं निमंत्रण  ! VIDEO

राजू शेट्टींची भाजप खासदारासोबत गळाभेट, 1 तारखेच्या मोर्चाचंही दिलं निमंत्रण ! VIDEO

सांगली – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आणि खासदार राजू शेट्टी यांची आणि  सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांची आज भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हातात – हात देत एकमेकांची गळाभेट घेतली. सांगलीच्या गेस्ट हाऊसमध्ये ही भेट झाली आहे. राजू शेट्टी हे पत्रकार परिषदेसाठी गेस्ट हाऊसमध्ये आले होते. यावेळी  खासदार संजय काका पाटील हे देखील पत्रकारांना भेटण्यासाठी गेस्ट हाउसमध्ये आले होते. त्यावेळी या दोघांची भेट झाली. तसेच या भेटीदरम्यान राजू शेट्टी यांनी हसत हसत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 1 तारखेच्या मोर्चाचे  निमंत्रणही खासदार संजय पाटील यांना दिल आहे.

दरम्यान यावेळी राजू शेट्टी यांनी सरकावर टीका केली आहे. ऊस कारखानदारीबाबत, गडकरी आणि फडणवीस यांच्या पैकी नेमके कोण खोटं बोलतंय, हे तुम्हीच सांगा, एकतर केंद्रीय नितीन गडकरी खोटं बोलत असावेत, नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साखर कारखानदारीतील काहीच कळत नसावे असा टोला शेट्टी यांनी लगावला आहे.

तसेच जर गडकरी यांना साखर कारखाना काढून चूक झाली असं वाटत असेल तर, कमी पैशात हडप केलेला कारखाना गडकरींनी परत देऊन टाकावा अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे. तसेच 1 तारखेला कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं असून एफआरपीच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS