राज्यसभा निवडणूक निकाल, मध्य प्रदेशात काँग्रेस तर राजस्थानात भाजपला धक्का!

राज्यसभा निवडणूक निकाल, मध्य प्रदेशात काँग्रेस तर राजस्थानात भाजपला धक्का!

नवी दिल्ली – राज्यसभेच्या 24 जागांसाठी आज दहा राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. यापैकी पाच जागा बिनविरोध तर 19 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का बसला असून याठिकाणी काँग्रेसला एकच जागा मिळवता आली आहे. काँग्रेसला किमान दोन जागा मिळतील असा अंदाज होता.
परंतु तो आता फोल ठरला असून
काँग्रेस एक तर भाजपला दोन जागांवर यश आलं आहे. भाजपच्या ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह यांचा तर काँग्रेसचे दिग्विजय सिंह हे विजयी झाले आहेत.ज्योतिरादित्य सिंधिया यांना 56, दिग्विजय सिंह 57 तर सुमेर सिंह यांना 55 मतं मिळाली आहेत.

दरम्यान राजस्थानमध्ये काँग्रेसला तीन पैकी दोन जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी भाजपला फक्त एक जागा मिळवता आली आहे.आंध्र प्रदेशात चारही जागा वायएसआर काँग्रेसला मिळाल्या आहेत. काँग्रेस उमेदवार वेणुगोपाल आणि नीरज डांगे तर भाजपच्या राजेंद्र गहलोत यांचा विजय झाला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपला 9 जागांवर विजय मिळवण्याचा विश्वास आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 84 होणार आहे.

COMMENTS