भाजप गुंडांना पाठीशी घालतय – जयंत पाटील

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींची सुटका करण्यासाठी भाजपा आमदार राम कदम यांनी फोन केल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राम कदम आणि पोलीस कॉन्स्टेबलमध्ये झालेल्या या संभाषणात राम कदम आरोपींची सुटका करण्यास सांगत आहेत. यावरून भाजप आणि राम कदम हे गुंडांना पाठीशी घातल असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर हे दुचाकीवरुन ट्रिपल सीट प्रवास करत होते. याशिवाय त्यांनी एका वाहनालाही धडक दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी रिक्षामधून आरोपींना पोलीस ठाण्यात नेत असताना आरोपींनी कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांच्यासोबत गैरवर्तन तसंच मारहाण केली.
यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी पोलिसांना फोन करुन आरोपींना सोडून देण्याची विनंती केली. “मी हल्ल्याचं समर्थन करत नाही. पण हा त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं अजून लग्नही झालेलं नाही. माणुसकीच्या नात्याने आणि त्यांच्या भविष्याचा विचार करता आपापसातही हे प्रकरण मिटलं असतं. तुम्ही इच्छा असेल तर कानाखाली मारा,” असं राम कदम सांगत असल्याचं ऐकू येत आहे.

जयंत पाटील म्हणाले, राम कदम यांनी यावेळी त्यांची सुटका करा सांगणं योग्य नाही असं सांगणे योग्य नाही. त्यामुळे पोलिसांवर हात उगारणाऱ्या लोकांना समर्थन दिल्या शिवाया राहणार नाही. महाराष्ट्र पोलीस भाजपची मनोवृत्ती ओळखून आहे. त्यामुळे पोलिसांवर हात उगारणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS