ब्रेकिंग न्यूज – रामदास आठवले यांच्यावर हल्ला ! व्हिडिओ

ब्रेकिंग न्यूज – रामदास आठवले यांच्यावर हल्ला ! व्हिडिओ

अंबरनाथ – केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर एका तरुणाने हल्ला केला आहे. काही वेळापूर्वीच हा हल्ला झाला आहे. रामदास आठवले एका कार्यक्रमासाठी अंबनाथमध्ये आले होते. त्यावेळी कार्यक्रम संपवून ते स्टेजवरुन खाली उतरत असताना तरुणांनी त्यांना मारहाण केली. आठवले खाली उतरत असताना तरुणांना त्यांना थप्पड मारली. त्यावेळी आठवले यांच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला पकडून बेदम चोप दिला आहे. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तो तरुण कोण आहे ?  त्याने आठवले यांच्यावर का हल्ला केला याचा पोलिस तपास घेत आहेत. आयबीएन न्यूज 18 या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. प्रवीण गोसावी असं हल्ला करणा-या तरुणाचं नाव आहे. तो आंबेडकरी चळवळीमधलाच आहे.

यूपीए टू च्या काळातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दिल्लीत असाच एका तरुणाने हल्ला केला होता. पवार त्यावेळी केंद्रात कृषी आणि अन्न व पुरवठा खात्याचे मंत्री होेते. वाढत्या महागाईच्या विरोधात त्याने पवारांवर चाकु हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्यांच्याजवळील सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले होते.

COMMENTS