शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत काढलेल्या फोटोमुळे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण वादात !

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत काढलेल्या फोटोमुळे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण वादात !

मुंबई – शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत काढलेल्या फोटोमुळे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण सध्या वादाच्या भोव-यात सापडले आहेत. रविंद्र चव्हाण यांनी पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला आहे. उल्हासनगर महापालिकेत आज महापौर निवडणुकीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी नवनिर्वाचित महापौर पंचम कलानी, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ओमी कलानी गेले होते. त्यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांचा हात शिवाजी महाराजांच्या खांद्यावर असतानाचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्यांच्या या फोटोमुळे रविंद्र चव्हाण वादात सापडणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत फोटो काढताना थेट रायगडावरील मेघडंबरीवर चढल्यामुळं अभिनेता रितेश देशमुख वादात सापडला आहे. त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर रितेशनं याबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती. त्यामुळे रविंद्र चव्हाण हे देखील दिलगिरी व्यक्त करुन माफी मागणार का असा सवाल आता राजकीय वर्तुळात केला जात आहे.

 

COMMENTS