रोहित पवारांचा आदित्य ठाकरेंना फोन!

रोहित पवारांचा आदित्य ठाकरेंना फोन!

मुंबई – विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार हे निवडून आले आहेत. आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर रोहित पवार हे अहमदनगरमधी कर्जत-जामखेड या मतदारसंघातून निवडून आले आहेत. रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधील भाजपचे पराभूत मंञी राम शिंदे यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आज रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना फोन केला आहे.

दरम्यान रोहित पवार यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांनीही रोहित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील नवी पिढी त्यांची राजकिय संस्कृती यातून भविष्यात महाराष्ट्रातील सक्षम राजकारण दिसून आलं आहे. तसेच शरद पवार यांच्या सांगण्यावरून रोहित पवारांनी आदित्य ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती आहे.

COMMENTS