काकांच्या डावामुळे पुतण्या चितपट

काकांच्या डावामुळे पुतण्या चितपट

बीड : बीड जिल्ह्याच्या राजकारणाला काका-पुतण्याचा संघर्ष नवा नाही. अगदी अलिकडे गोपिनाथ मुंडे विरुध्द धनंजय मुंडे यांच्यानंतर क्षीरसागर यांच्या कुटुंबात जयदत्त क्षीरसागर विरुध्द संदीप क्षीरसागर असा संघर्षा पाहिली मिळत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत संदीप यांनी काकांवर मात करून आमदारकी पदरात पडून घेतली. मात्र, एक वर्षांनंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र, काका जयदत्त यांनी खेळलेल्या डावामुळे संदीप चितपट झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांनी धोबी पछाड दिल्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर प्रचंड बॅकफूटला गेले आहेत. पराभवामुळे नैराश्यात गेलेल्या संदीप क्षीरसागर यांच्या गटाकडून बीड नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडीत एकही अर्ज सादर करण्यात आला नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या स्थायी समितीवर भारतभूषण क्षीरसागर यांचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. आधीच ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागलेल्या संदीप क्षीरसागर यांच्या हातून स्थायी समितीचीही सत्ता गेल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी वर्षभरातच संदीप क्षीरसागर यांना मतदारांचा कौल समजून घेता आला नसल्याने त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा दणका बसला आहे. विधानसभा निवडणुकीत अल्पमतांनी पराभूत झालेले काका जयदत्त क्षीरसागर यांचं पारडं बीडमध्ये जड होताना दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पुतण्याला धूळ चारत जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघावरची पकड मजबूत केली आहे.

COMMENTS