शिवसेना खासदार संजय राऊत  रूग्णालयात दाखल !

शिवसेना खासदार संजय राऊत रूग्णालयात दाखल !

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडली असून त्यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्याने त्यांना 2 दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. दोन दिवस संजय राऊत हे डॉक्टरांच्या निगराणीखाली असणार आहेत.
संजय राऊत यांची प्रकृती स्थिर आहे, आणि काळजी करण्याचं काहीही कारण नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसेच संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी संजय राऊत त्यांची अॅन्जिओग्राफी करायची किंवा नाही याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. मागील अनेक दिवसापासून ते आक्रमक भूमिका पार पाडत होते, या ताणतणावातच त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना, रूग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे.

COMMENTS