“शरद पवारसाहेब एनडीएत या, उपपंतप्रधानपद मिळेल”

“शरद पवारसाहेब एनडीएत या, उपपंतप्रधानपद मिळेल”

वर्धा – भाजप विरोधी आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक इच्छुक आहेत. पंतप्रधान पदावरुन त्यांच्यात संघर्ष होणार हे निश्चित आहे. राहुल गांधींच्या पंतप्रधानपदासाठी शरद पवार पाठिंबा देणार नाहीत. तर शरद पवारांना राहुल गांधी पाठिंबा देणार नाहीत. मात्र शरद पवार एनडीएमध्ये आले तर त्यांना देशाचे उपपंतप्रधानपद मिळू शकते असा विश्वास आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे अशी ऑफरही आठवले यांनी पवारांना दिली आहे.

एनडीएमध्ये पंतप्रधानपदासाठी वाद नाही. नरेंद्र मोदी हेच 2019 मध्ये पंतप्रधान होणार असंही आठवले म्हणाले. सर्वपक्ष मोदींच्या विरोधात एकवटत आहेत. याचा अर्थ मोदींना सगळे घाबरले आहेत. मोदी सरकार उत्तम काम करत आहे. 60 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही. ते मोदी सरकारने 4 वर्षात केले असंही आठवले म्हणाले. प्रकाश आंबडेकर आणि एमआयएम युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही असा दावाही आठवले यांनी केला.

COMMENTS