शिवसेनेला धक्का, ‘या’ नेत्यांचा मनसेत प्रवेश!

शिवसेनेला धक्का, ‘या’ नेत्यांचा मनसेत प्रवेश!

मुंबई – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत येऊन शिवसेनेने सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपमधील अनेक नेते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु अशातच शिवसेनेलाच धक्का बसला असून काही नेत्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव तसेच भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. तर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दशरथे आणि शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेची वाट धरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘कृष्णकुंज’वर ही मेगाभरती झाली.

दरम्यान पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावरही त्यांनी टीकेची तोफ डागली. ‘चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे.

हर्षवर्धन जाधव पुन्हा मनसेत

हर्षवर्धन जाधव हे २००९ साली मनसेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. मधल्या काळात अंतर्गत वादामुळं शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे.

COMMENTS