शिवसेना आमदाराची नाराजी उघड, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला दांडी!

शिवसेना आमदाराची नाराजी उघड, उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला दांडी!

मुंबई – शिवसेना आमदाराची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली आहे.
कोकणातील शिवसेना आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. परंचु या बैठकीला नाराज असलेल्या शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दांडी मारली. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे. यापूर्वी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.

दरम्यान भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीत असताना महत्त्वाची खाती सांभाळलेली होती. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून ते शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे त्यांची नाराजी कशी दूर करणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS