शिवसेना खासदारांना मोदींकडून दुय्यम स्थान, नमस्कार केला तर पाहतही नाहीत – शिवसेना खासदार

शिवसेना खासदारांना मोदींकडून दुय्यम स्थान, नमस्कार केला तर पाहतही नाहीत – शिवसेना खासदार

नवी दिल्ली –  शिवसेना खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुय्यम स्थान दिलं जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या खासदारांनी केला आहे. सभागृहात मोदींना नमस्कार केला तर ते आमच्याकडे पाहतही नाहीत असा आरोप शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी केला आहे. सध्या आम्ही  सोबत असलो तरी यानंतर मात्र शिवसेना हा अपमान कदापि सहन करणार नसल्याचंही कीर्तीकर यांनी म्हटलं आहे.तसेच  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कीर्तीकर यांची पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत घेण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान भाजपसाठी २०१९ ची निवडणूक कठीण होणार असून फक्त शिवसेनाच नाही तर देशातील इतरही अनेक पक्ष भाजप आणि मोदींवर नाराज आहेत. त्यामुळे मोदी लाट केव्हाच संपली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर येऊन बरोबर राहण्याची भाषा करीत असले तरी  शिवसेना मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचं कीर्तीकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS