शिवसेेनेला धक्का, मंत्री अर्जुन खोतकार यांची आमदारकी रद्द !

शिवसेेनेला धक्का, मंत्री अर्जुन खोतकार यांची आमदारकी रद्द !

औरंगाबाद – शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द झाली आहे. मुंबई उच्च न्यायलयाच्य औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. काँग्रेस उमेदवार आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत खोतकर यांनी उमेदवारी अर्ज उशीरा भरल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान कोर्टाने खोतकर यांना सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली आहे. त्यामुळे एक महिना त्यांची आमदारकी राहणार आहे. या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं खोतकर यांनी सांगितलं आहे.

वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्यानंतर खोतकर यांनी स्थानिक उपविभागीय अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास पात्रच नव्हते, असे याचिकेत नमूद होते. या याचिकेवर शुक्रवारी (24 नोव्हेंबर) सुनावणी झाली. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये खोतकर केवळ २९६ मतांनी विजयी झाले होते.

अर्जुन खोतकरांची राजकीय कारकिर्द

अर्जुन खोतकर हे जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहे.

सध्याच्या युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात ते राज्यमंत्री आहेत.

खोतकरांकडे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्यसविकास मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे.

खोतकर हे चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.

1999 मधील शिवसेनेच्या सरकारमध्येही खोतकर यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली होती.

COMMENTS