रत्नागिरीत स्वाभिमान आणि शिवसेनेत राडा !

रत्नागिरीत स्वाभिमान आणि शिवसेनेत राडा !

रत्नागिरी – रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांचा स्वाभिमान आणि शिवसेनेमध्ये राडा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानच्या अमित देसाई या कार्यकर्त्याला एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर रत्नागिरी शहरातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बाबा चव्हाण यांच्या दुकानावर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये वाद सुरु झाला आहे. तसेच या वादावरुन पोलिसांनी ‘स्वाभिमान’वर एकतर्फी कारवाई केली असल्याचा आरोप माजी खासदार नीलेश राणे यांनी केला आहे.

दरम्यान जिल्ह्यात नीलेश राणे  हे दहशत निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला अशून रत्नागिरीचे पोलीस गृहराज्यमंत्र्यांच्या दबावाखाली कारवाई करत असल्याचा निलेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये सध्या स्वाभिमान आणि शिवसेनेमधील वातावरण तापलं असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS