“मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, जितेंद्र आव्हाड स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो !”

“मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, जितेंद्र आव्हाड स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो !”

ठाणे – जितेंद्र आव्हाड स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो, कोणाचे चोरलेले डायलॉग मारत नाही. मी स्वत: स्क्रिप्ट लिहितो, स्वत: डायलॉग मारतो आणि स्वत:च्या आवाजात मारतो. मी एकदाच नवी मुंबईत गेलो तर गणेश नाईकांनी कथककल्लीच सुरु केली आहे. अजून तर मी शंभरवेळा जाणार आहे. त्यानंतर माझा बापदेखील येईल. मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नसल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
भाजप नेते गणेश नाईक यांनी डायलॉगबाजी करुन, ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल, असं आव्हाडांवर टीकास्त्र सोडलं होतं, त्याला आव्हाडांनी उत्तर दिलं आहे.

दरम्यान राजकारणाची जत्रा झालीय असं ते म्हणतात. मात्र जत्रेत ज्या झोळ्या लटकत असतात, त्याप्रमाणे गणेश नाईकांनी राजकारण केलं. 90 ते 2000 एका झोळीवर, 2000 ते 2014 पर्यंत एका झोळीवर, आता दुसऱ्याच झोळीवर आहेत. त्यामुळे आता ते या झोळीवर किती दिवस राहतील माहित नाही. नवी मुंबईकरांना था था थय्याच बघायचा बाकी असल्याची टीकाही आव्हाड यांनी केली आहे.

COMMENTS