त्रिपुरात भाजपला विजयाचा उन्माद, राज्यभरात माकपची कार्यालये फोडली, लेनीनचा पुतळा बुलडोजरने पाडला !

त्रिपुरात भाजपला विजयाचा उन्माद, राज्यभरात माकपची कार्यालये फोडली, लेनीनचा पुतळा बुलडोजरने पाडला !

आगरतळा – ईशान्यकडील त्रिपुरामध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय झाल्यानंतर तो साजरा करताना तिथल्या भाजप कार्यकर्त्यांचं ताळतंत्र सुटल्याचं चित्र आहे. त्रिपुरातील माकपाच्या अनेक कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. त्यामध्ये कार्यालयाचं मोठं नुकसान झालं आहे.

एवढच नाही तर त्रिपुरातील लेनीनचा पुतळाही पाडण्यात आला. हा पुतळा पाडण्यासाठी चक्क बुलडोजरची मदत घेण्यात आली. वैचारिक मतभेद असू शकतात. त्रिपुरातील जनतेने माकपवर नाराजीमुळेच भाजपच्या हातात मोठ्या अपेक्षेने सत्ता सोपवली. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे देशभर भाजपची प्रतिमा मलिन झाल्याशिवाय राहणार नाही.

COMMENTS