सोनिया गांधींनी घेतली विरोधीपक्षाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक,  ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं!”

सोनिया गांधींनी घेतली विरोधीपक्षाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं!”

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशभरातील विरोधीपक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे चार, तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तिसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी उपस्थित होते.

दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कॅबिनेट बैठक असल्यामुळे आधी बोलू द्या, अशी विनंती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केली. उद्धव ठाकरे यांनी प्रांजळपणे ममतादीदींना परवानगी मागितली असता, “उद्धवजी आप बहुत अच्छा फाईट कर रहे है” अशी स्तुतिसुमने उधळली. तेंव्हा उद्धव ठाकरे यांनी अभिमानाने “लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं !” असं म्हटलं.

या बैठकीत केंद्र सरकारशी लढायचे की घाबरुन बसायचे, हे आपण ठरवायला हवे” असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडले. “संकट आलं की आपण एकत्रित येतो. पण आपल्याला एकत्रित यायला संकटाची गरज कशाला आहे? आपण एरवीसुद्धा भेटत राहिले पाहिजे, ज्यामुळे संकटच घाबरुन म्हणेल की हे लोक एकत्र आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेबाबत ही बैठक घेण्यात आली. सोनिया गांधींनी बैठकीत सर्वप्रथम जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. जीएसटी राज्य सरकारांना वेळेवर द्यावा. पैसे न दिल्याने राज्य सरकारांची आर्थिक स्थितीवर बिकट होत असल्याचं त्या म्हणाल्या. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सध्या नीट-जेईई परीक्षा घेणे सुरक्षित नाही. जर केंद्र सरकार प्रयत्न करत नसेल तर सर्व राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयाकडे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करावी असं म्हटलं आहे.

COMMENTS