यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदींचा विजय !

यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदींचा विजय !

यवतमाळ – यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला असून शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय झाला आहे, तर भाजपच्या सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांना 298 मत मिळाली तर भाजपचे
सुमित बाजोरिया यांना 185 मत मिळाली.दुष्यंत चतुर्वेदींचा विजय निश्चित होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये जल्लोष करण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या जागी माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. चतुर्वेदींनी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.

COMMENTS