विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या अंबादास दानवेंचा विक्रमी विजय!

विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या अंबादास दानवेंचा विक्रमी विजय!

मुंबई – औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा दणदणीत विजयी झाला आहे. दानवे यांनी काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांचा ४१८ मतांनी पराभव केला आहे. दानवे यांनी तब्बल 524 मते घेत विक्रमी विजय मिळवला आहे. दानवे यांच्यासमोर काँग्रेस आघाडीने भवानीदास कुलकर्णी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. कुलकर्णी यांना अवघी 106 मते मिळाली आहे. तसेच या निवडणुकीसाठी उभे रराहिलेले अपक्ष उमेदवार शाहनवाज यांना अवघी 3 मते मिळाली आहेत.

दरम्यान 45 नगरसेवकांनी दानवे यांना निवडणुकीपूर्वीच समर्थन दिले होते. या सगळ्यांच्या एकूण मतांपेक्षा दानवे यांना 187 अधिकची मते मिळाली आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण 647 मते पडली होती. यातील शिवसेना भाजपची हक्काची अशी 292 मते होती. विजयानंतर अंबादास दानवे यांनी मत देणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. विधान परिषदेत महायुतीच्या दानवे यांचा विजय झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही याचे परिणाम दिसू शकतात असं बोललं जात आहे.

COMMENTS