..मंत्र्याची बायको जेव्हा चुलीवर स्वयंपाक करते

..मंत्र्याची बायको जेव्हा चुलीवर स्वयंपाक करते

अहमदनगर : मंत्री पद म्हटलं किंवा मंत्र्याचं कुटुंब म्हटलं की मोठेपणा… बडेजाव… सगळा कार्यक्रम अगदी कसा थाटात प्रोटोकॅलनुसार पण या सगळ्याला महाविकास आघाडीतील एक मंत्री अपवाद आहेत. त्यांच्या बायकोने आपला थाट बाजूला सारून चुलीवर स्वयंपाक केला. त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यांची राज्यात चर्चा रंगत आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आणि अहमदनगरचे आमदार प्राजक्त तनपुरे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. सोनाली तनपुरे या प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी आहेत. राहुरी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांशी सोनाली तनपुरे जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांची नाळ समाजाशी जोडली आहे.

त्यांचा वागण्या-बोलण्यात असलेला गोडवा मतदारसंघातील लोकांना नेहमीच भावत असतो. काल त्यांनी आपण मंत्र्याची बायको आहोत हे विसरुन त्यांच्या घरच्या कामवाल्या बाईंच्या घरी जाऊन चुलीवर स्वयंपाक केला. त्यांच्या या साधेपणाची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.

COMMENTS