…आणि पंतप्रधान मोदींना आले विमान हायजॅक केल्याचं ट्विट

…आणि पंतप्रधान मोदींना आले विमान हायजॅक केल्याचं ट्विट

जयपूर – मुंबईहून दिल्लीला जाणारे जेट एअरवेजचे विमान खराब हवामानामुळे जयपूरला वळवण्यात आले. विमान अचानक जयपूरला वळवण्यात आल्याने एक प्रवासी चांगलाच घाबरला. विमानाचे अपहरण झाल्याचा संशय आल्याने नितीन वर्मा त्याने थेट पंतप्रधानांना ट्विट करत त्यांच्याकडे मदत मागितली.
या ट्विटमुळे मोठा गोंधळ उडला प्रसंगावधान बाळगत जयपूर विमानतळावर विमान पोहोचताच तेथील सुरक्षारक्षकांनी चौकशी केली. ‘आम्ही तीन तासांपासून जेट एअरवेजच्या 9 डबल्यू 355 या विमानात आहोत. या विमानाचे अपहरण झाल्यासारखे वाटत आहे. आम्हाला कृपया मदत करा,’ असे ट्विट मुंबईहून जाणाऱ्या नितीन वर्मा या प्रवाशाने पंतप्रधान मोदींना केले.
प्रवाशाने पंतप्रधान मोदींच्या नावाने ट्विट करताच विमानतळ सुरक्षा दलांनी लगेच जयपूर विमानतळावर चौकशी केली. दिल्ली-मुंबई जयपूरला उतरताच ट्विट करणाऱ्या जेट एअरवेजच्या संबंधित प्रवाशाची चौकशीदेखील करण्यात आली. प्रवाशाच्या ट्विटमुळे विमानतळावरील सुरक्षा दलाचे जवान सतर्क झाल्याची माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनी दिली. ‘विमानाचे अपहरण झाल्याच्या शक्यतेबद्दलच्या ट्विटनंतर संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या. मात्र असं काही झालं नसून फक्त विमान उड्डाणाला उशीर झाल्याने या प्रवाशाने हे ट्विट केल्याचं समोर आलं.

नितीन वर्मा यांच्या ट्विटनंतर पंतप्रधान कार्यालयात धावपळ सुरु झाली होती. त्यांना तात्काळ भारतीय विमानतळ प्राधिकरण, हवाई वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्ट दिला. नितीन वर्मा यांनी भीती निर्माण केली असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद आला आहे.

COMMENTS