होय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर

होय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांनी राफेल करारासंदर्भातील वक्तव्यावरून नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तारिक अन्वर यांनी राजीनामा दिला होता. शरद पवार यांच्याशी काहीही न बोलता अन्वर यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. परंतु मी राजीनामा देण्यापूर्वी शरद पवारांशी बोलायला हवं होतं असं तारिक अन्वर यांनी वक्तव्य केलं आहे. नवभारत टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अन्वर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान शरद पवार यांनी राफेलवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याने तारिक अन्वर यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच पवारांच्या वक्तव्यानंतर ते आपली बाजू मांडतील असं मला वाटत होतं. त्यासाठी मी दोन दिवस वाटही बघितली परंतु पवार यावर काहीही बोलले नाहीत. त्यामुळे मी तडकाफडकी राजीनामा दिला. परंतु राजीनामा देण्यापूर्वी मी पवारांशी बोलायला हवं होतं असं अन्वर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS