नगरपंचायत लढवलेल्या काँग्रेसच्या “या” दोन उमेदवारांची राज्यभर चर्चा !

नगरपंचायत लढवलेल्या काँग्रेसच्या “या” दोन उमेदवारांची राज्यभर चर्चा !

मुंबई – राज्यात ३२ जिल्र्यांमध्ये झालेल्या १०६ नगरपंचायतीचे निकाल नुकतेच लागले आहेत. त्यामध्ये भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचा नंबर लागतो. तर तिस-या क्रमांकवर काँग्रेस तर सर्वात कमी जागा राहत चौथा क्रमांक शिवसेनेनं पटकावला आहे. राज ठाकरेंच्या मनसेला तर केवळ ४ जागा मिळाल्या आहेत. या निकालांमध्ये वेगेवेगळी वैशिष्ट्य आहेत. अनेकजणांनी विक्रम प्रस्थापीत केले आहेत. मात्र सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती काँग्रेसच्या दोन उमेदवारांची. कोण आहेत ते उमेदवार ते पाहूया

काँग्रेसच्या एका उमेदवाराची चर्चा सुरू आहे ते त्याने घेतलेल्या विक्रमी मतांमुळे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं प्रदीप तितरमारे यांना तिकीट दिलं होतं. त्यांनी या संधीचं सोनं करत तब्बल ९६.२१ मते त्यांना मिळाली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मते मिळवलेले प्रदीप हे राज्यातलील एकमेव उमेदवार ठरले आहेत. प्रदीप उभे असलेल्या वॉर्ड क्रमांक ९ मध्ये एकूण ४७५ मतदान झालं. त्यापैकी तब्बल ४५७ मते प्रदीप यांना मिळाली. त्यांच्या विरोधात एका उमेदवाराला ९ तर एकाला ५ मते मिळाली. या ऐतिहासीक विजयामुळे प्रदीप यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

भंडा-यात विक्रमी मते घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराने नाव कमावलं असताना दुसरीकडे बीडमध्ये मात्र एका उमेदवाराला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक ६ मधून फकीर शब्बीर बाबू हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यानां एकही मत पडलं नाही. एकूण १९८ मतदान झालं. त्यापैकी भाजपचे उमेदवार गणेश भांडेकर यांना १५५ मते मिळाली. तर दुस-या क्रमांकावर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शांतीलाल चोरडिया यांना ४३ मतांवर समाधन मानावं लागलं. काँग्रेसच्या उमेदवाराला मात्र शून्य मत मिळालं. त्यांचं मतदानही दुस-या वॉर्डात होतं. त्यामुळे त्यांना तिथं मतदान करत आलं नाही.

COMMENTS