उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट !

उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संख्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेणार आहेत. उद्धव यांच्यासोबत ठाण्याचे पालकमंत्री, कल्याण डोंबिवलीचे आयुक्त आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील कामे होत नाहीत. त्यांना निधी मिळत नाही अशा तक्रारी नगरसेवकांनी केल्या आहेत. त्यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे.

COMMENTS