उष्माघातापासून बचावासाठी काय काळजी घ्याल ?  सांगताहेत आरोग्य मंत्री

उष्माघातापासून बचावासाठी काय काळजी घ्याल ?  सांगताहेत आरोग्य मंत्री

मुंबई – उष्माघात झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांत केंद्रे सुरु केली आहेत, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी   केले आहे. डॉ. सावंत म्हणाले की, उष्माघात झालेल्या रुग्णांना तत्काळ मदत मिळावी, या हेतूने 104 व 108 या क्रमांकावर हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी  घ्यावयाच्या दक्षतेबाबत आरोग्य विभागातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत.

हे करू नका

 

-दुपारी 12 ते 3 उन्हात फिरु नका.

-मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

-उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.

-पार्किंग केलेल्या बंद वाहनांच्या आत मुले किंवा पाळीव प्राण्यांना ठेवून जाऊ नका.

हे करा

-तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.

– सौम्य रंगाचे सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.

-बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.

– प्रवास करताना सोबत पाणी घ्या.

– आपले घर थंड ठेवा. पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.

-उन्हात डोक्यावर छत्री व टोपीचा वापर करा.

-डोके, गळा, चेह-यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.

-अशक्तपणा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

-ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक प्या.

-जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या.

– थंड पाण्याने आंघोळ करा.

COMMENTS