उस्मानाबाद – मुख्यमंत्री शनिवारी  जिल्हा दौऱ्यावर, रेंगाळलेल्या कामांचा कसा घेणार आढावा ?

उस्मानाबाद – मुख्यमंत्री शनिवारी  जिल्हा दौऱ्यावर, रेंगाळलेल्या कामांचा कसा घेणार आढावा ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येऊन विकास कामांचा आढावा घेणार आहेत. परंतु, जिल्ह्यात यंदाच्या वर्षातील सर्वच योजनेतील कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे काय आढावा घेणार याबाबत उत्सुकता आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना रेंगाळली आहे. 2015-16 मध्ये जलयुक्त शिवार योजनेत चांगली कामे झाली. परंतु, 2016-17 वर्षात जलयुक्त मध्ये निवडलेल्या अनेक गावात कामेच सुरू झाली नाही. वर्ष संपले आहे. तरीही तब्बल चार हजार कामे सुरूच झालेली नाहीत. रोजगार हमी योजनेची कामे सुरूच केली जात नाहीत. सिंचन विहिरी, शेतकऱ्यांना शेततळे, फळबागा देण्याचा प्रयत्न विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केला आहे. परंतु, जिल्ह्यातील अधिकारी याकडे पूर्णपणे डोळेझाक करीत आहेत. यंदाच्या वर्षात तब्बल 97 गावात एक रुपयाचाही खर्च झालेला नाही. त्यामुळे विकास कामे ढेपाळली असल्याची चर्चा आहे.

तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांकडून दिशाभूल

तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याचा गाजावाजा केला. इंग्रजी माध्यमात बातम्या छापून आणल्या प्रत्यक्षात कामेच झालेली नसल्याचे लक्षात येताच विभागीय आयुक्तांनी सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे. त्यामुळे आता रेंगाळलेल्या कामांची मुख्यमंत्र्यांकडून कशी पाहणी होते. कसा आढावा घेताात, याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे.

COMMENTS