एकनाथ खडसे यांना अटक करा – अंजली दमानिया

एकनाथ खडसे यांना अटक करा – अंजली दमानिया

मुंबई – आपल्याविषयी एकनाथ खडसे यांनी अत्यंत खालच्या पातळीचं वक्तव्य केल्याचा आरोप करत खडसे यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. खडसे यांचं वक्तव्य अत्यंत खालच्या दर्जाचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.  

भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी खडसे यावर कारवाई करावी अशी मागणी ही दमानिया यांनी केली आहे.  भाजपा सभ्य पक्ष म्हणून घेत असेल तर खडसे सारखी वक्तव्य करणारी चालतात का असा सवाल ही दमानिया यांनी केला आहे.

COMMENTS