ऑटो रिक्षा, काळी-पिवळी, वेब टॅक्‍सींचे दर लवकरच ठरणार

ऑटो रिक्षा, काळी-पिवळी, वेब टॅक्‍सींचे दर लवकरच ठरणार

खटुआ समितीचा अहवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सुपूर्द

मुंबई : रिक्षा, काळी-पिवळी टॅक्‍सी तसेच वेब आधारित टॅक्‍सींचे भाडेनिश्‍चिती आता लवकरच ठरणार आहे. हे नव्याने दर निश्‍चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत नेमण्यात आलेल्या खटुआ समितीने आपला अहवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सुपूर्द केला. 

224 पानांचा असलेला हा अहवाल  मंत्रालयात श्री. खटुआ यांनी मंत्री श्री. रावते यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, समितीचे सदस्य गिरीष गोडबोले, नितीन दोशी आदी उपस्थित होते. परिवहन मंत्री श्री. रावते म्हणाले की, परिवहन विभागामार्फत या अहवालाचा सविस्तर अभ्यास केला जाईल. जनतेवर जास्त भार न पडता भाडेनिश्चिती केली जाईल. शहरांमध्ये धावणाऱ्या ॲप तथा संकेतस्थळचलित सिटी टॅक्सीच्या भाडेनिश्चिती संदर्भातही समितीने शिफारशी केल्या असून त्याचा अभ्यास करुन तात्काळ निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

10 ऑक्टोबर, 2016 रोजी ही समिती नेमण्यात आली होती. 30 सप्टेंबर 2017 पर्यंत या समितीची मुदत होती. समितीने मुदतीत सविस्तर अभ्यास करुन आज हा अहवाल शासनाकडे सादर केला. ऑटो रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, सिटी टॅक्सी (संकेतस्थळचलित टॅक्सी), एसी टॅक्सी यांचे दर निश्चित करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती.

COMMENTS