कर्जमाफीच्या मुद्दावर सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणतायेत ?

कर्जमाफीच्या मुद्दावर सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणतायेत ?

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

महाराष्ट्र सरकार आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेतून सर्वमान्य असा तोडगा निघाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी सरकारने मान्य केली असून यासंदर्भातील अटी आणि तपशील संयुक्त समितीमार्फत निश्चित केला जाईल. दुधाचे दर वाढले पाहिजे, ही मागणी सुध्दा राज्य सरकारने मान्य केली असून, त्यासोबतच साखर कारखान्यांच्या धर्तीवर दूध सोसायट्यांना नफ्याचा 70:30 हा फॉर्म्युला मान्य करावा लागणार आहे. शेतकरी आणि त्यांचा विकास, समृध्दी ही राज्य सरकारची सर्वोच्च प्राथमिकता कालही होती, आजही आहे आणि भविष्यात सुध्दा राहील. यासंदर्भात गठीत करण्यात आलेला मंत्रिगट राजकीय मतैक्य तसेच समावेशकतेसाठी सर्व राजकीय पक्षांशी सुध्दा चर्चा करेल.

………………………………………………………….

रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

केवळ अल्पभूधारक नव्हे तर सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय रविवारी केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सरकार सदैव शेतकऱ्यांची बाजू घेत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्चाधिकार समितीचे प्रमुख महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केली.

………………………………………………..

दिवाकर रावते, मंत्री, शिवसेना

शिवसेना पहिल्यापासून आंदेलक शेतक-यांच्या बाजुने होती. सरसकट कर्जमाफी ही शिवसेनेची पहिल्यापासूनची मागणी होती. त्याप्रमाणे निर्णय झाला. आनंद आहे. सर्वांचे आभार आणि अभिनंदन

……………………………………………..

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सर्व शेतकरी संघटना एका व्यासपीठवर आल्या ही समाधानची बाब, राज्य सरकार, आणि सुकाणू समितीची बैठक आशदायी झाली अशी दिसते. सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करतो. 7/12 चा उतरा कोरा करण्याची घोषणा, राज्य सरकारचे अभिनंदन. तातडीने अंमलबजावणी करावी.

…………………………………………..

राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढले व त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी मोठा लढा उभारला. कर्जमाफीसंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या लढ्याचा व संघर्ष यात्रेचा विजय असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, सरकारने या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, असेही त्यांनी बजावले आहे.

…………………………………………………..

अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतक-यांनी पुकारलेला संप आणि काँग्रेससह विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या दबावामुळे सरकार झुकले असून सरकारने तत्वतः सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची समाधानकारक अंमलबजावणी होईपर्यंत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आक्रमक राहणार आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटाचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

…………………………………………………….

अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. आजपर्यंत अनेक आत्महत्या झाल्या. आता स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीसाठी पंतप्रधान यांना भेटण्याची काय गरज आहे ? त्यांनी आधीच निवडणुकीत आश्वासन दिले आहे… शेतकरी कर्जमाफ़ी शिवाय सरकार चालवू शकत नाही… हे समजल्या मुळेच कर्जमाफी झाली आहे. आमच्या संघर्ष यात्रेला यश आले.

COMMENTS