केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले; पंतप्रधान मोदींनी घेतले पहिले दर्शन

केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले; पंतप्रधान मोदींनी घेतले पहिले दर्शन

गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. उत्तरखंडामध्‍ये आलेल्‍या महाप्रलयाच्या 3 वर्षांनंतर पहिल्यांदाच येथे जंगी सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिमालयातील केदारनाथ मंदिराला भेट देऊन त्याठिकाणी रूद्राभिषेक करत पूजा अर्चा केली. आज सकाळी आठ वाजता देहरादून येथे मोदींचे आगमन झाले. त्यानंतर साधारण नऊच्या सुमारास ते केदारनाथ मंदिरात पोहोचले.

मोदी यांनी केदारनाथाचे दर्शन घेतल्यानंतर उपस्थित जनसमुदायालाही संबोधित करताना म्हणाले की, उद्या मी देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडला भेट देणार आहे. या दौऱ्याची सुरूवात आज मी केदारनाथाचे दर्शन घेऊन केल्याचे मोदींनी यावेळी म्हटले.

 

COMMENTS