गायकवाड आडनाव असणे गुन्हा आहे का ? – भाजप खासदाराचा सवाल

गायकवाड आडनाव असणे गुन्हा आहे का ? – भाजप खासदाराचा सवाल

गायकवाड आडनाव असणे गुन्हा आहे का ? असं म्हणण्याची वेळ भाजपचे लातुरचे खासदार सुनिल गायकवाड यांच्यावर आली आहे. शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात केलेल्या मारहाण प्रकरणानंतर त्यांना विमानातून प्रवास करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्याचा फटका खासदार सुनिल गायकवाड यांना बसत आहे. रविंद्र गायकवाड यांना एअर इंडियाने नो-फ्लायर्स लिस्टमध्ये टाकले आहे. त्यामुळे सुनिल गायकवाड हेही खासदार आहेत. दोघांचे आडनावही एकच आहे त्यामुळे अधिकाऱ्यांना वाटते की सुनील गायकवाड हेच रवींद्र गायकवाड आहेत. त्यामुळे त्यांना अडवून त्यांची विचारपूस करून केली गेली. हा प्रकार प्रत्येकवेळी विमातनातून प्रवास करतना होत आहे. त्यामुळे त्रासलेलेल्या सुनिल गायकवाड यांनी याची माहिती केंद्रीय राज्य मंत्री जयंत सिन्हा यांना दिली आहे. गायकवाड आडनाव असणे हा गुन्हा आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. विमान कंपन्यांनी दिलेल्या या त्रासामुळे आपला वेळ जात आहे आणि मनस्तापही होत आहे असे सुनील गायकवाड यांनी म्हटले.

पुणे ते दिल्ली विमानप्रवासा दरम्यान एअर इंडियाचे कर्मचारी सुकुमार यांना त्यांनी मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चिघळले. आपल्याजवळ बिजनेस क्लासचे तिकीट असताना एअर इंडियाने आपल्याला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवले असे रवींद्र गायकवाड यांनी म्हटले. त्यांनी आपल्याला तक्रार करायची आहे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोलायचे आहे असे म्हटले. त्यानंतर सुकुमार हे अधिकारी त्या ठिकाणी आले. सुकुमार आणि गायकवाड यांच्यामध्ये वाद झाला. पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला २५ वेळा सॅंडलने मारल्याची कबुली दिली होती. त्यानंतर इअर इंडियाने त्यांना विमान प्रवास करण्यावर बंदी घातली. त्यामुळे त्यांनी इंडिगोचे तिकीट काढले परंतु त्यांना इंडिगो तसेच इतर विमान कंपन्यांनी देखील त्यांना प्रवास करण्यावर बंदी घातली.

COMMENTS