छत्रपती संभाजीराजेंसमोर भाजप- शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले, उद्घाटन न करताच राजे परतले !

छत्रपती संभाजीराजेंसमोर भाजप- शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले, उद्घाटन न करताच राजे परतले !

मालेगाव – मालेगाव पंचायत समितीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन कऱण्यासाठी काल खासदार छत्रपती संभाजीराजे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे आले होते. मात्र या इमारतीचं उद्घाटन यापूर्वीच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ठरले होते असा दावा शिवसेनेने केला. कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवेसनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलीस आणि शिवेसैनिकांमध्ये झटापटही झाली. सौम्य लाठीमार करत पोलिसांनी शिवसैनिकांना तिथून काढून दिलं. मात्र या गोंधळामुळे छत्रपती संभाजीराजे आणि डॉ. सुभाष भामरे यांना इमारतीचं उद्घाटन न करताच तिथून परत जावं लागलं.

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांच्या प्रयत्नातुन पंचायत समितीची इमारत उभी राहिली असा शिवसेनेचा दावा आहे. त्यामुळे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते  इमारतीचे उदघाटन  निश्चित झाले होतं. मात्र जिल्हा परिषद् व् पंचायत समिती निवडणूक आचारसंहिता लागल्याने इमारतीचं अनावरण  होवू शकलं नाही .निवडणुकीत दरम्यान पंचायत समिती  निवडणुकीत  सत्तांतर  झाले आणि भाजपची सत्ता  आली. त्यांनी डॉ. भामरे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते हा कार्यक्रम ठेवला. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी कार्यक्रमात गोंधळ घातला.

 

COMMENTS