जनावरांचे आठवडी बाजार बंद होणार ?

जनावरांचे आठवडी बाजार बंद होणार ?

ग्रामीण भागातील जनावरांचे आठवडी बाजार  बंद होण्याची शक्यता आहे.  केंद्र सरकारनं आठवडी बाजारात होणाऱ्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घातले आहेत. पर्यावरण मंत्रालयाने कायद्यात दुरुस्ती करून हे निर्बंध घातले आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

जनावरे विकताना ती कत्तलखान्यात जाणार नाहीत याची लेखी हमी विक्री करणाऱ्याला स्थानिक बाजार समितीला द्यावी लागणार आहे. आठवडी बाजारात जनावरे खरेदी करणाऱ्यालाही तशी लेखी हमी द्यावी लागणार आहे. जनावरे विक्रेते आणि खरेदीदार यांना स्वतःच्या छायाचित्रासह जनावरांचे छायाचित्र जोडावे लागणार आहे. या अटींमुळे आठवडी बाजारात गुरे विकायला शेतकऱ्यांना अडचणी येणार असून जनावरांचे आठवडी बाजार ओस पडण्याची भीती आहे.

COMMENTS