लातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टेला मोदींच्या हस्ते 1 कोटींचं बक्षीस !

लातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टेला मोदींच्या हस्ते 1 कोटींचं बक्षीस !

नागपूर: सरकारतर्फे देशात डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी म्हणून डिजीधन योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त प्रमाणात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांना ‘लकी ड्रॉ’ च्या माध्यमातून बक्षीस प्रधान करण्यात आले. यात लातूरची श्रद्धा मेंगशेट्टे हिला 1 कोटीचं बक्षीस मिळाले आहे. आज (शुक्रवार) नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाग्यवान विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली.

श्रद्धाने केवळ 1490 रुपयांचा डिजीटल व्यवहार केला होता. मात्र डिजीधन योजनेअंतर्गत ती भाग्यवान ठरली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या श्रद्धानं काही दिवसांपूर्वी हफ्त्यांवर एक मोबाईल खरेदी केला होता. त्याच मोबाईलचा हफ्ता श्रद्धानं डिजीटलरित्या भरला होता. याच व्यवहारासाठी तिला 1 कोटींचं बक्षीस मिळालं. लातूरमध्ये राहणाऱ्या श्रद्धा मेंगशेट्टेचे वडील किराणा दुकान चालवतात. मात्र, अवघ्या 1490 रुपयांच्या व्यवहारानं ती आता करोडपती झाली आहे.

या योजनेत 1 हजाराचीही अनेक बक्षीसं आहेत. मात्र आज नागपुरात प्रामुख्यानं ‘लकी ड्रॉ’ चे विजेते असणाऱ्या 6 प्रमुख भाग्यवतांना बक्षीस दिलं गेलं. तर चिमन भाई प्रजापती ( गुजरात ) यांना 50 लाखाचं दुसरं आणि केवळ शंभर रुपयांचं डिजीटल पेमेंट करणारे भरत सिंह ( देहरादून ) यांना 25 लाख रुपयांचं तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं.

 

COMMENTS