चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिका निवडणुकीची वैशिष्ट्ये

चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिका निवडणुकीची वैशिष्ट्ये

चंद्रपूर

1) जिल्ह्यात एक केंद्रीय मंत्री, एक राज्याचा अर्थमंत्री असूनही भाजपला काठावरचे बहुमत

2) काँग्रेसचा दारुण पराभव, 26 जागांवरुन 12 जागांवर घसरण

3) बसपा महापालिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, बसपला 8 जागा

4) शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे संयुक्त रित्या चौथ्या क्रमांकावर, प्रत्येकी 2 जागा

 

लातूर 

1) जिल्ह्यात काँग्रेसची घसरण सुरूच, लोकसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि त्यानंतर आता महापालिकेतही पराभव

2) भाजप झिरोचा हिरो झाला. गेल्यावेळी शून्य जागा असणा-या भाजपने यावेळी स्पष्ट बहुमत मिववले. भाजपला 36 जागा मिळवल्या

3) काँग्रेसला 33 जागा मिळाल्या

4) राष्ट्रवादीचीही घसरण, 8 वरुन 1 जागेवर घसरण, एकमेव उमेदवारही केवळ 5 मतांनी निवडूण  आला.

5) शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही.

 

परभणी

1) राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, 30 वरुन 18 जागांवर घसरण

2) काँग्रेसचा चढता आलेख, 23 वरुन 31 वर झेप

3) भाजपचं संघटन नसतानाही तिस-या क्रमांकावर मुसंडी, 8 जागा मिळाल्या

4) शिवसेनेला मोठा धक्का, 6 जागांस चौथ्या स्थानावर घसरण

5) स्थानिक आमदार, खासदार असतानाही शिवसेनेला अपयश

COMMENTS