नगर – सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन !

नगर – सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन !

अहमदनगर – कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दशक्रिया विधी आंदोलन करण्यात आलं. नगर-सोलापुर महामर्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात परिसरातील नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्तारोकोमुळे महामार्गावर वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना तिथून उठवले.

COMMENTS