नागपूरसह विदर्भाला मिळणार नव्या रेल्वेगाड्या

नागपूरसह विदर्भाला मिळणार नव्या रेल्वेगाड्या

नागपूर : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नागपूरसह विदर्भाला नव्या रेल्वेगाड्या आणि विकासकामांची भेट मिळाली. तीन नवीन रेल्वे गाड्यांसह एकूण 20 विविध विकासकामांचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

 

यावेळी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित होते. राज्य सरकारचे नेहमीच रेल्वेला सहकार्य मिळत आले असल्याचे रेल्वेमंत्री प्रभू यावेळी म्हणाले. राज्य सरकार आणि रेल्वे मिळून एक नवीन कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून विकासासाठी ही कंपनी कार्य करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली .

 

COMMENTS