नेवाळी प्रकरणी पाच जिल्ह्यांची समिती स्थापन

नेवाळी प्रकरणी पाच जिल्ह्यांची समिती स्थापन

नेवाळीच्या शेतजमिनींचा तिढा सोडवण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमधील आगरी, कोळी आणि कुणबी समाज एकत्र येऊन एक समिती स्थापित करणार आहे. या समितीत आगरी, कोळी आणि कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

या समितीच्या माध्यमातून नेवाळी परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती आगरी नेते संतोष केणे यांनी दिली आहे. नेवाळी विमानतळासाठी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांच्या लष्कराने नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात गेली. आता यात नौदलाने जागेवर दावा सांगत कम्पाऊंड टाकल्याने शेतकरी संतप्त झाले होते . जवळपास 7 ते 8 गावातील शेतकऱ्यांच्या जमीन यामुळे बाधित होणार आहे. सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसरात शेतकऱ्यांनी 22 जूनला उग्र आंदोलन केलं होतं, या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाईचा बडगा उचलला, तसेच 135 आंदोलकांवर गुन्हे दाखल करत 58 आंदोलनकर्त्यांना अटक केली होती. अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांना मारहाण होत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याचमुळे एक समिती स्थापन करून या आंदोलकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कल्याण आणि परिसरातल्या इतर आंदोलन समित्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

COMMENTS