महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंतप्रधान मोदींचे अभिवादन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंतप्रधान मोदींचे अभिवादन

नागपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊन महामानवाला अभिवादन केले. येथील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीलाही पंतप्रधानांनी अभिवादन केले. यावेळी मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते.
सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान यांचे आगमन झाले. पंतप्रधानांच्या स्वागताच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल व्ही. विद्यासागर राव हे उपस्थित होते. दीक्षाभूमी हे देशातील नव्हे तर जगातील बौद्ध धर्मीयांचे एक प्रमुख केंद्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.

 

आंबेडकर जयंतीनिमित्त मोदींनी या दीक्षाभूमीवर जाऊन आंबेडकर यांना अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटनही होणार आहे. दीक्षाभूमीवरुन नरेंद्र मोदी कोराडी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात जातील. तिथे केंद्रातील दोन नवीन पॉवर स्टेशनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्या सोहळ्यानंतर मानकापूरस्थित क्रीडा संकुलात नीती आयोगातर्फे आयोजित डीजीधन मेळावा होत आहे. या मेळाव्याला मोदी उपस्थित राहतील. मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवण्यात आली आहे. विमानतळापासून ते कोराडी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रापर्यंत एकूण २ हजार २०० पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.

COMMENTS