पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव महापालिकांच्या निवडणुका जाहीर !

पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव महापालिकांच्या निवडणुका जाहीर !

आज निवडणूक आयोगाने पनवेल, भिवंडीनिजामपूर आणि मालेगाव महापालिकांची निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. या तिन्ही महापालिकांमध्ये 24 मे रोजी मतदान होईल आणि 26 मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आजपासून तीनही महापालिकांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज केली.

भिवंडी, पनवेल आणि मालेगाव या तीनपैकी पनवेल महापालिकेची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे इतर दोन महापालिकांप्रमाणेच या महापालिकेत कुणाची सत्ता येणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

 

COMMENTS