पुणे महापालिकेचे 5 हजार 912 कोटींचे अंदाजपत्रक सादर !

पुणे महापालिकेचे 5 हजार 912 कोटींचे अंदाजपत्रक सादर !

पुणे महापालिकेचे 2017-18 या आर्थिक वर्षाचे 5 हजार 600 कोटी रुपयांचे  अंदाजपत्रक महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समिती समोर सादर केले होते. त्यामध्ये नव्या योजनांचा समावेश करित स्थायी समिती अध्यक्ष मुरूलीधर मोहळ यांनी 312 कोटींनी वाढ करित 5 हजार 912 कोटींचे अंदाजपत्रक सर्व साधारण सभेपुढे सादर केले. यावेळी सर्व पक्षांनी एकमताने या अंदाजपत्रकाला मंजूरी दिली. दरम्यान,’ महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, आयुक्त कुणाल कुमार, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले, मनसेचे गटनेते वसंत मोरे तसेच शहरातील सर्व नगरसेवक सभागृहात उपस्थित होते.

अंदाजपत्रकातील काही महत्त्वाच्या मुद्दे….

– घनकचरा विभागामार्फत शहरातील कचरा संकलनासाठी 15 घंटागाड्या,कचरा वाहतुकीसाठी 40 गाड्या कंटेनरसह त्याचबरोबर 200 गाड्या वाहतुकीसाठी भाड्याने घेण्याचे नियोजन आहे.

– पाणी पुरवठा विभागासाठी महसूली तरतूद 352 कोटी 31 लाख, भांडवली कामासाठी 788 कोटी 57 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

-केंद्र सरकारच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे. यासाठी 990 कोटी रुपये मंजूर झाले असून महापालिका हिश्याची 150 कोटीची तरतुद करण्यात आली.

-चोवीस तास समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाईप लाईन टाकणे, नव्या पाण्याच्या टाक्या उभारणे. या सर्व कामासाठी 302 कोटींची तरतुद करण्यात आली.

– एचसीएमटीआरचा 35 किलोमीटर लांबीचा रस्ता ताब्यात घेण्यात येणार आहे.

-मिळकत कर विभागासाठी 1 हजार 333 कोटी 60 लाख रुपयांचे ठेवले असून सर्व मिळकतीचे जीआयएस मैपिंगद्वारे सर्वेक्षण होणार आहे. यामुळे 1 हजार 718 कोटींचे वसुली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

– बांधकाम परवनगी आणि विकास शुल्क विभागा मार्फत 1 हजार 25 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

– समुद्री जैव विविधता केंद्र उभारण्यासाठी 1 कोटीची विशेष तरतुद करण्यात आली.

– शिवसृष्टी प्रकल्पासाठी 10 कोटीची विशेष तरतुद करण्यात आली.

– गणेश उत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करित आहे. या उत्सवासाठी 2 कोटी रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली.

– पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना कवच योजनेसाठी 10 कोटीची विशेष तरतुद करण्यात आली आहे.  हा अपघात विमा पाच लाख रुपयांचा असणार असून त्यामध्ये प्रामणिकपणे कर भरणा होणार आहे. यामधून महापालिकेचे उत्पन्न देखील वाढेल आणि नागरिक विमा ही मिळणार आहे.

– भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी 15 कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

-डॉ. नायडू रुग्णालयात हे महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. त्यातून शहरातील रुग्णांना चांगले उपचार मिळतील हाच उद्देश आहे. तसेच सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज करिता 5 कोटींची विशेष तरतुद करण्यात आली आहे.

-पश्चिम पुण्याच्या भागात महापालिकेचे नवीन  सुसज्ज असे रुग्णालया उभारण्यासाठी 5 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. मात्र या पूर्वी देखील कमला नेहरु रुग्णालयासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली. खासगी रुग्णालयाप्रमाणे सेवा देण्यासाठी यंत्रणा देखील पुरवण्यात आली. पंरतु, मागील 5 वर्षाहून अधिका कालावधीपासून ती यंत्रणा धुळखात पडली आहे. यावर कोणी बोलण्यास तयार नाही.

– पुणे शहराला दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. हे लक्षात घेता कुंडलिका नदीतून वाया जाणारे पाणी अडवून वरसगाव धरणामध्ये आणले जाणार आहे. यासाठी 1 कोटीची तरतुद करण्यात आली. यामुळे किमान 1 टीएमसीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

– पीएमपीएमएल आधिक सक्षम करण्यासाठी 145 कोटी रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली.1550 बस खरेदी केली जाणार असून 370 मार्गावर बसची संख्या वाढवण्यावर भर राहणार आहे. पीएमपीएमएल बससाठी 13 डेपो नव्याने उभारण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटींची विशेष तरतुद करण्यात आली आहे.

-प्रायोगिक रंगभूमीसाठी 1 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.

– उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपोमध्ये 750 टनाचा प्रकल्प उभारला जाणार आहे.

– मोशी आणि पिंपरी सांडस येथील जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याससाठी आणि तेथील कामे करण्यासाठी 78 कोटी 45 लाख रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली आहे.

-मेट्रो प्रकल्पासाठी फक्त 50 कोटीची तरतुद करण्यात आली.

– पुणे महापालिकेच्या सर्व शाळा ई-लर्निग करण्यासाठी 6 कोटीची विशेष तरतुद करण्यात आली आहे.

– पुणे शहराचा केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये समावेश झाला आहे.या अंतर्गत 51 प्रक्ल्पांचे कामे केली जाणार असून यासाठी महापालिकेने 50 कोटीची तरतुद केली.

– महापालिकेच्या दोन प्रसूतिगृहामध्ये नवजात अर्भक कक्ष विकसित करण्यासाठी 2 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली.

– आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थीसाठी वसतीगृहे उभारण्यासाठी 1 कोटीची तरतुद.

– महापालिकेच्या शाळामधील विशेष नैपुण्य प्राप्त करणा-या विद्यार्थीसाठी लोकमान्य टिळक गुणवत्ता पुरस्कार दिला जाणार असून यासाठी 50 लाख रुपयांची विशेष तरतुद.

-भिडेवाडा दुरूस्ती आणि स्मारक उभारण्याच्या कामासाठी 1 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली.

COMMENTS