पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागले !

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागले !

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रती लीटर 1.23 रुपये, तर डिझेल 89 पैसे प्रती लीटरने महागले आहे. नवे दर मध्यरात्री लागू झाली आहेत.

मुंबईत पेट्रोलचे दर 76.55 रुपयांवरुन 78.12 रुपये प्रती लीटर एवढे होतील. पेट्रोलचे दर राजधानी दिल्लीत मध्यरात्रीपासून 65.32 रुपयांहून 66.91 रुपयांवर जातील. यापूर्वी 16 मे रोजी पेट्रोलच्या किंमतीत 2.16 रुपये प्रती लीटर, तर डिझेलच्या किंमतीत 2.10 रुपये प्रती लीटरने कपात केली होती. मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

 

 

COMMENTS