प्रधानमंत्री आवास योजनेतही महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार – पंकजा मुंडे

प्रधानमंत्री आवास योजनेतही महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार – पंकजा मुंडे

मुंबई – सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी सन २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेंतर्गत संवर्गनिहाय उद्दिष्टाएवढी ५ हजार १२९ प्रकरणे मंजूर करुन त्यापैकी १ हजार ४१ घरे सहा महिन्याच्या आत पूर्ण केली आहेत.  यामध्ये कोयना धरण परिसर व डोंगराळ भागात, ज्या ठिकाणी घरकुल बांधकामाचे साहित्य बोटीद्वारे अथवा बैलगाडीद्वारे घेवून जावे लागते अशा ठिकाणी घरकुले २ ते ३ महिन्याच्या कालावधीमध्ये पुर्ण केलेली आहेत.  या उल्लेखनीय कामाबद्दल महाराष्ट्र राज्याचा व जिल्हा विकास यंत्रणा यांचा भारत सरकारच्यावतीने दि.१९ जून रोजी नवी दिल्ली येथे गौरव करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलीय.

 

COMMENTS