माजी मुख्यमंत्री 82 व्या वर्षी झाले 12 वी पास ! वाचा इंट्रेस्टिंग स्टोरी…..

माजी मुख्यमंत्री 82 व्या वर्षी झाले 12 वी पास ! वाचा इंट्रेस्टिंग स्टोरी…..

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्याविषयी सध्या फारशा बातम्या येत नाहीत. कारण ते सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी फारशा बातम्या येण्याचा प्रश्नच नाही. मात्र सध्या त्यांनी एक रेकॉर्ड केलंय. त्याच्यासंदर्भातली बातमी सर्वच प्रसारमाध्यमांध्ये दिसते आहे. ते म्हणजे त्यांनी या वर्षी 12 वीची परिक्षा दिली. आणि त्यामध्ये ते चांगल्या गुणांनी पासही झाले आहेत. त्यांना ए ग्रेड मिळालाय. सध्या त्यांचं वय 82 वर्ष आहे. देशाच्या इतिसाहात एका माजी मुख्यमंत्र्यांनी तुरुंगामध्ये असताना 82 व्या वर्षी परिक्षा देऊन पास झाल्याचं कुठेही नोंद नाही.

या बातमीत गंमत अशी आहे. ओप्रकाश चौटाला यांचे वडील देवीलाल हे शेतक-यांच्या प्रश्ननावरुन आंदोलन केले त्यामुळे अनेक दिवस तुरुंगात होते. त्यामुळे घरची देखभाल करण्यासाठी ओमप्रका चौटाला यांना शाळा सोडावी लागली होती. पुढे राजकारणारत गेल्यानंतर चौटाला यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यांना हरियाणात शिक्षक घोटाळ्यात 10 वर्षांच्या तुरुंगवास झाला. तुरुंगात काय करायचं म्हणून त्यांनी 12 वीचा अभ्यास केला आणि परिक्षाही दिली. दररोज ते तरुंगातील लायब्ररीमध्ये जात असत. आता 12 वी नंतर तरुंगातूनच ते पदवी मिळण्यासाठी अभ्यास करत आहेत. वडीलांच्या तुरुंगवासामुळे शाळा सोडवी लागली, मात्र स्वतःच्या तुरुंगवासामुळे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली.

COMMENTS