मानवाला 100 वर्षातच पृथ्वीवरील गाशा गुंडाळावा लागणार !

मानवाला 100 वर्षातच पृथ्वीवरील गाशा गुंडाळावा लागणार !

येत्या 100 वर्षात मानवाला पृथ्वीवरील गाशा गुंडाळावा लागणार आहे, असे  भाकित प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे. येत्या काही वर्षात पृथ्वी मानवी वास्तव्ययोग्य राहणार नसल्याने माणसाला हे पाऊल उचलावेच लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.

पृथ्वी या ग्रहाबाबत अनेक शास्त्रज्ञ नेहमीच वेगवेगळे दावे करत असतात. याआधी पृथ्वी संपणार, पृथ्वीचा स्फोट होणार यासारखे अनेक दावे करण्यात आले आहेत. आता ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी भाकित केले की, येत्या 100 वर्षात मानवाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल. येत्या काही वर्षात पृथ्वीवर मानव राहू शकणार नाही, अशी परिस्थीती निर्माण होणार आहे, त्यामुळे हे पाऊल उचलावंच लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.

‘बीबीसी टीव्ही’च्या ‘टुमारोज वर्ल्ड’ या मालिकेतल्या ‘एक्स्पिडिशन न्यू अर्थ’ या डॉक्युमेंटरीमध्ये स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे शिष्य हे पृथ्वी व्यतिरिक्त परग्रहावरील माणसाच्या वास्तव्याच्या शक्यतेवर शोध घेणार आहेत. याच डॉक्युमेंटरीमध्ये स्टीफन यांनी दावा केलाय की, जर मानव जातीला जिवंत ठेवायचे असेल तर दुस-या एखाद्या ग्रहावर जीवनाचा शोध घ्यायला हवा.

गेल्या महिन्यातही स्टीफन यांनी चिंत व्यक्त केली होती की, तंत्रज्ञानाच्या विकासासोबत मानवाची आक्रामकता अधिक धोकादायक झाली आहे. हीच प्रवृत्ती आण्विक शक्ती आणि रासायनिक हल्ल्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा विनाश करू शकते. मानवाला राहण्यासाठी नवा ग्रह शोधावा लागेल, असंही मत त्यांनी मांडले. लवकर हालचाली केल्या नाहीत, तर अनर्थ ओढावू शकतो. मानवाला परग्रहावर वास्तव्य करावंच लागेल असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

ग्लोबल वार्मिंग हा मुद्दाही अनेक अभ्यासक नेहमीच मांडत आले आहेत. मात्र त्याकडे तितक्या गंभीरतेने कोणताही देश बघत नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक देश आपलं वर्चस्व वाढण्यात लागला आहे. अशात जर वेगवेगळ्या कारणांनी पृथ्वीच नष्ट झाली तर मनुष्य प्राण्याचा नायनाट होणार…त्यामुळे पृथ्वीला वाचवण्यासाठी सर्व देशांनी मिळून एकत्र जर प्रयत्न केले तर यातून मार्ग निघू शकतो.

 

COMMENTS