राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

राज्याचा सन 2017-2018 चा वार्षिक अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात येणार आहे. शुक्रवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये विकास दर वाढला तरी उद्योग, घरबांधणी, व्यापार, वाहतूक क्षेत्रांत घटगृह (ग्रामीण) घट झाल्याचा निष्कर्ष यात काढण्यात आला आहे. आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर विधानपरिषदेत राज्याच्या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

 
दरम्यान, काल दिल्लीवरून परतताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’वर बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे सर्व कॅबिनेट मंत्री हजर होते. या कॅबिनेट बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना अजूनही कर्जमुक्तीच्या मुद्यावर ठाम असल्याचे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीनंतर सांगितले. राज्य सरकारची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत मुख्यमंत्री आपली भूमिका आज विधानसभेत स्पष्ट करतील. त्यानंतर शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करतील असे, शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS