राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा भाजपला पाठिंबा –  सूत्र

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा भाजपला पाठिंबा – सूत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीची तय्यरी सुरू केली आहे. त्यासाठी एनडीएची आज दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. दरम्यान, भाजपने दिलेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

विशेष म्हणजे मातोश्रीवर बैठक बोलावणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परंपरा खंडीत करुन या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत आज एनडीएच्या 32 पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. खुद्द पक्षाध्यक्ष अमित शाह यांनीच मित्रपक्षांच्या नेत्यांना फोनकरुन बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले आहे.

या बैठकीस काश्मीरपासून ते केरळपर्यंत आणि गोव्यापासून ते नागालँडपर्यंत असलेल्या मित्रपक्षाला भाजपने या बैठकीस बोलावले आहे. विशेष म्हणजे मातोश्रीवरच बोलणे होईल या शिवसेनेच्या ताठर भूमिकेत बदल करत ठाकरे यांनी शाह यांच्या निमंत्रणाला होकार कळवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीची परंपरा मोडीत काढल्याची चांगलीच चर्चा माध्यमातून रंगत आहे.

 

 

 

COMMENTS